WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

ख्रिश्चन स्मशानभूमीला संरक्षक भिंत उभारणार


ख्रिश्चन स्मशानभूमीला संरक्षक भिंत उभारणार

नगराध्यक्षांनी केली पाहणी, स्वच्छतेच्या सूचना

चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड परिसरात असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीची स्वच्छता व संरक्षक भिंत उभारण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत असताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली.

या पाहणीदरम्यान नगराध्यक्ष सकपाळ यांनी संबंधित विभागाला स्मशानभूमी परिसराची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी कंपाउंड वॉल उभारणे आणि आवश्यक त्या ठिकाणी भराव टाकण्याचेही निर्देश त्यांनी दिले. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ही कामे प्राधान्याने व लवकर पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, भाजप गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, नगरसेवक उदय जुवळे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, स्मशानभूमीच्या देखभालीसंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यास परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!