WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

राज्यातील 34 एसपी कार्यालयांत ‘सर्वोत्कृष्ट’ श्रेणीत ‘रत्नागिरी’चा 5 वा क्रमांक


राज्यातील 34 एसपी कार्यालयांत ‘सर्वोत्कृष्ट’ श्रेणीत ‘रत्नागिरी’चा 5 वा क्रमांक

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी करत महाराष्ट्र राज्यातील 34 पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये “सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय” या श्रेणीत 5 वा क्रमांक पटकावला आहे.

शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत हा 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (Quality Council of India – QCI) या स्वायत्त संस्थेमार्फत करण्यात आले. या मूल्यमापनाचे निकाल 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केले.

या मूल्यमापनात शासकीय कार्यालयांची कामगिरी खालील सात महत्त्वाच्या निकषांवर तपासण्यात आली होती.
➡️कार्यालयाची अधिकृत वेबसाईट
➡️‘आपले सरकार’ प्रणालीचा प्रभावी वापर
➡️ई-ऑफिस प्रणाली
➡️कार्यालयीन डॅशबोर्ड
➡️व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर
➡️एआय (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
➡️GIS तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने वरील सर्व निकषांची प्रभावी अंमलबजावणी केली. या सामान्यीकृत व प्रमाणित मूल्यमापनात एकूण 200 गुणांपैकी 144.25 गुण प्राप्त करत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात 5 वा क्रमांक मिळवला.

या उल्लेखनीय यशामागे योगदान देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातही ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना अधिक उत्कृष्ट, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याचा संकल्प रत्नागिरी पोलीस दलाने व्यक्त केला आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!