साहेब, आशीर्वाद द्या!
गुहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट
गुहागर : गुहागर नगरपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांची मुंबईतील रायगड बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. नगरपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या वेळी गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. निता मालप यांच्यासह नगरसेवक श्री. उमेश भोसले, नगरसेविका सौ. वैशाली मावळणकर, अनुषा भावे, सुषमा रहाटे, मिरा घाडे, विषाखा सोमण तसेच भाजपाकडून शिवसेनेला दिलेले उमेदवार सौ. स्वरा तेलगडे व संदेश उदेक उपस्थित होते.
याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा निवडणूक संयोजक दीपक पटवर्धन, भाजपा प्रदेशाध्यक्षांचे सहकारी श्री. अनिकेत पटवर्धन, रेल्वे समिती सदस्य सचिन वहाळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, पदवीधर पदाधिकारी अशोक दळवी, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगले, शहराध्यक्ष नरेश पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष मुन्ना पालशेतकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान गुहागर नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावीपणे लाभ घेण्याबाबत चर्चा झाली. आगामी काळात गुहागरच्या विकासासाठी भाजप व महायुतीच्या माध्यमातून ठोस प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











