WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चार प्रश्नांची उत्तरे द्या ; लक्ष्मी ऑरगॅनिकला आंदोलकांचे थेट आव्हान


चार प्रश्नांची उत्तरे द्या ; लक्ष्मी ऑरगॅनिकला आंदोलकांचे थेट आव्हान

चिपळूण : लोटे परशुराम एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जी-60 वरील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजच्या उपकंपनी यलो स्टोन फाईन केमिकल्स विरोधात स्थानिक आंदोलकांनी थेट आक्रमक भूमिका घेत कंपनी व्यवस्थापनास चार थेट प्रश्न विचारत लेखी उत्तरांची मागणी केली आहे. “प्रश्नांची फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी स्पष्ट उत्तरे कंपनीच्या लेटरहेडवर सहीनिशी द्यावीत, त्यानंतरच धरणे आंदोलन मागे घ्यायचे की नाही, यावर विचार करू,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

कोकण नारी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक रहिवासी संघटनांच्या वतीने हे आव्हान देण्यात आले आहे. पीफास (PFAS) संबंधित फ्लोरिनेटेड केमिकल्स उत्पादन आणि त्याच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आंदोलकांनी कंपनीच्या दाव्यांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आंदोलकांनी दावा केला आहे की, या प्रकल्पातील मशिनरी, पेटंट आणि प्रॉडक्ट फॉर्म्युला हे इटलीतील Miteni S.P.A. कंपनीकडून आयात झाले असून, त्या कंपनीच्या नावाशी जलप्रदूषण व आरोग्यविषयक गंभीर वाद जोडले गेले होते. त्यामुळे लोटे परिसरात अशाच प्रकारच्या प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

आंदोलकांचे कंपनीला चार थेट प्रश्न
आंदोलकांनी लक्ष्मी ऑरगॅनिकसमोर खालील चार मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे –

प्रश्न : १.

मे २०२५ मध्ये ‘Chemspec’ फेअरच्या प्रेझेंटेशन ब्रोशरच्या चौथ्या पानावर, तुम्ही असे नमूद केले आहे की तुम्ही “भारतामधील एकमेव electro chemical fluorination निर्माता” आहात आणि तुम्ही “PFOA आणि PFOS च्या abatement व नियंत्रणासाठी प्रगत प्रणाली बसवली आहे” असेही स्पष्ट केले आहे. तुम्ही हे विशिष्ट पदार्थ तयार करता का? किंवा तयार करण्याचा तुमचा काही प्लान आहे का? आणि तुमच्या म्हणण्यानुसार ही प्रगत यंत्रणा आपल्या लक्ष्मी कंपनीच्या आस्थापनेत सध्या काम करतेय का ?

उत्तर – हो किंवा नाही ?

प्रश्न-२.

०९ नोव्हेंबर २०२१ रोजी Laxmi Organic Industries यांनी गुंतवणूकदारांसोबत घेतलेल्या बैठकीमध्येउपस्थित एका व्यक्तीने पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे कि, “Miteni चे assets आपण fluorine chemistry मध्ये प्रवेश करण्यासाठी विकत घेतले आहेत. मी त्या कंपनीबद्दल थोडं वाचलं, तर groundwater प्रदूषणासारख्या पर्यावरणीय उल्लंघनांमुळे Miteni कंपनी दिवाळखोरीत गेली. तसेच विकसित देशांमध्ये PFAs आणि PFOS

संदर्भात मोठ्या प्रमाणात विरोध आहे. भारतात सध्या PFAs वर फारसे नियम नाहीत, त्यामुळे सध्याच्या दृष्टीने ते ठीक वाटतं. पण भविष्यात तुम्हाला काय दिसतं ? (उद्या भारतात देखील असा विरोध झाला आणि नियम कडक झाले तर दीर्घकालीन दृष्टीने अशा परिस्थितीत सापडू नयेम्ह णून तुम्ही काही वेगळं करणार आहात का ?” यावर तुमचेअर्थात Laxmi Organic यांचे उत्तर असे होते कि, “या उत्तराचे दोन भाग आहेत. पहिला म्हणजे, Miteni चा जो प्रश्न आहे तो ४० वर्षांपूर्वीपासूनचा legacy issue आहे, म्हणूनच ते अडचणीत आले. Miteni चे शेवटचे मालक गेल्या सुमारे ३० वर्षांत युरोपियन मानकांनुसार कायदेशीर पद्धतीने काम करत होते. आमच्या बाबतीत, Laxmi म्हणून आम्ही नेहमी आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करतो तेफक्त आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांमुळे नाही, तर आम्ही सर्वोत्तम पद्धतींवर विश्वास ठेवतो. त्यामुळे आम्ही भारतातही अशाच प्रकारच्या नियमांचे पालन करू आणि Miteni ने ठेवलेल्या विद्यमान सुरक्षा मानकांचे जतन व त्यात अधिक सुधारणा करू. तुम्ही ज्यांचा उल्लेख करत आहात ते PFOA आणि PFOS हे long chain products आहेत आणि तेआमच्या उत्पादन योजनेचा किंवा उत्पादन यादीचा भाग नाहीत. ते ४० वर्षांपूर्वी तयार केले गेले होते आणि ते ऐतिहासिक स्वरूपाचे असून आता जागतिक स्तरावर अप्रासंगिक आहेत.” तुम्ही म्हणजे Laxmi Organic Industries आजही या उत्तरातील विधानांची पुष्टी (confirm) आणि पुनरुच्चार (reaffirm) करतेका ?

उत्तर – हो किंवा नाही ?

प्रश्न- ३.

२०२४ मधील Chem News India मधील एका लेखानुसार, Laxmi ला “1HFY25 दरम्यान २० पैकी १६ ग्राहकांकडून fluorospecialty samples साठी मान्यता (approval) मिळाली आहे.” त्या लेखात हेही नमूद केले आहे की, Laxmi “उल्लेखित उत्पादने आणि formulations चे भारतातील एकमेव निर्माता आहे.” ह्या माहितीची तुम्ही पुष्टी करता का ?

उत्तर- हो किंवा नाही ?

प्रश्न – ४.

“Specialty Intermediates साठी प्रस्तावित ८,५०० MT/महिना क्षमतेच्या Synthetic Organic Chemicals प्लांटसाठीचा Environmental Impact Assessment (EIA) Report,” हा प्लांट उभारण्याच्या तयारीत मार्च २०१८ मध्ये करण्यात आला होता. हा रिपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, तुम्ही आधीच Miteni किंवा ICIG सोबत संपर्कात होता का ?

उत्तर- हो किंवा नाही ?

“उत्तरांवर ठरणार आंदोलनाची दिशा”
आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, या चारही प्रश्नांची ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी थेट लेखी उत्तरे मिळाल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.

पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना महत्त्व प्राप्त झाले असून आता लक्ष्मी ऑरगॅनिक व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!