WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश!


रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश!

दलवाई हायस्कूलमध्ये रंगली स्पर्धा

चिपळूण : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथे सोमवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ अंतर्गत स्वच्छता विषयक रांगोळी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते नववीच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत स्वच्छतेचा प्रभावी संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या साकारल्या. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारा धोका, वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे मूल्य अशा विविध विषयांवर आधारित रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या रांगोळी प्रदर्शनाला इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून स्वच्छतेचे महत्त्व अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेः
🥇 प्रथम क्रमांक – दुर्वांग प्रमोद जाधव, ऋग्वेद जाधव, संतोष मोहिते, संभव मंदार फागे (इयत्ता आठवी)
🥈 द्वितीय क्रमांक – आराज्ञा संतोष कांबळे, गार्गी महेश दळवी (इयत्ता आठवी)
🥉 तृतीय क्रमांक – निधी महेंद्र हेलवंडे, श्रमिका सीताराम भुवड (इयत्ता नववी ‘ब’)

स्पर्धेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक सुभाष मते व रागिनी आरेकर यांनी केले.

एकूणच, हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव दृढ करणारा आणि पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!