गिरणी कामगारांच्या घरांचा लढा होणार आणखी तीव्र
🔷 चिपळुणात 19 रोजी सभा
🔷 कामगार नेते गोविंदराव मोहिते यांची उपस्थिती
चिपळूण : गिरणी कामगार व वारसदार यांच्या घराच्या प्रश्नावर लढा उभारण्यासाठी ग्रामीण पातळीवर सभा घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 19 रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चिंचनाक्याजवळ गिरणी कामगारांची सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस व कामगार नेते गोविंदराव मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.

१४ कामगार संघटना एकत्र आलेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे प्रमुखनेते,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली परळ येथे सभा होऊन १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनावर गिरणी कामगारांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे लढा समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहेत. मार्चमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी,सकाळी 11 वाजता चिपळूण,चिंच नाका, येथील आंबेडकर हॉलवर गिरणी कामगारांची सभा होणार आहे.या सभेला खेड, मंडणगड, दापोली, संगमेश्वर येथील गिरणी कामगार व वारसदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
चिपळूण येथील प्रचार सभा लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील लढा यशस्वी करण्यासाठी,ग्रामीण पातळीवरील सभाना गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रीय मतदार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सर्व पदाधि काऱ्यांची आज मजदूर मंझीलमध्ये तातडीची बैठक होऊन, गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील लढा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.










