WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोकणच्या सुपुत्राची ‘आयआयएम’ मुंबईत मोठी झेप;


कोकणच्या सुपुत्राची ‘आयआयएम’ मुंबईत मोठी झेप

‘एसव्हीआयएमएस’च्या माध्यमातून गौरव सावर्डेकरचा सन्मान

चिपळूण : बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी नाही, तर तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, हे कोकणच्या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटीच्या सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज & रिसर्च तसेच SVIMS Business School मध्ये शिक्षण घेणाऱ्या गौरव संतोष सावर्डेकर (मूळ रा. काडवली-खेड, सध्या शिक्षण- वडाळा मुंबई) या विद्यार्थ्याने ‘आयआयएम’ (IIM) मुंबई येथे ‘एआय इन मॅनेजमेंट’ (AI in Management) प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करत विशेष पुरस्कार पटकावला आहे. गौरवच्या या यशामुळे संपूर्ण कोकण विभागाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

गौरव सावर्डेकर हा चिपळूणमधील पत्रकार संतोष सावर्डेकर यांचा ज्येष्ठ चिरंजीव असून त्याने यापूर्वी चिपळूणमधील परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे प्राथमिक तर नंतर महाविद्यालयीन शिक्षण डीबीजे महाविद्यालयात घेतले. तर मांडकी-पालवण येथे ऍग्रीकल्चर बिटेकची पदवी प्राप्त केली. तर आता आणखी पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त एसव्हीआयएमएस बिजनेस स्कुल येथे पीजीडीएम पदवीचे शिक्षण घेत आहे.

ही शिक्षण संस्था आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते. आगामी ‘एआय’ (Artificial Intelligence) युगासाठी आपल्या विद्यार्थ्यांना ‘फ्युचर रेडी’ करण्यासाठी महाविद्यालयाने थेट आयआयएम मुंबई सोबत हे विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते.

या संधीचा फायदा घेत गौरव सावर्डेकर याने आपल्या कल्पकतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी गौरव याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी लॉजिस्टिक्स सप्लाय चेन आणि मार्केटिंग यासारख्या विषयांवर आपले शोध निबंध आणि प्रोजेक्ट मॉडेल्स सादर केले. एसव्हीआयएमचे प्राध्यापक अयान ठाकूर यांनी गौरव सावर्डेकर याच्यासह अन्य विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पूर्वतयारी करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे सादरीकरण दर्जेदार झाले.

याबद्दल गौरव सावर्डेकरचा आयआयएमच्या प्रोफेसर पूर्णिमा सांगळे, प्रोफेसर अमित कुमार दास, प्रोफेसर रॉनी मित्रा यांनी सन्मान केला. तसेच या तीनही प्रोफेसरनी एसव्हीआयएमच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. गौरवच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तर एसव्हीआयएमने आयआयएमच्या प्रोफेसरना धन्यवाद दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि ५ जागतिक प्रमाणपत्रे
‘एसव्हीआयएमएस’ हे केवळ एक महाविद्यालय नसून प्रगतीचे द्वार आहे. येथे विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट पदवीसोबतच पाच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांची प्रमाणपत्रे मिळतात:
१. डेल कार्नेगी (USA)
२. ईटी मास्टरक्लास (इकॉनॉमिक टाइम्स)
३. व्हॅल्यू ग्लोबल (USA)
४. वर्ल्ड ट्रेड सेंटर (मुंबई)
५. इंडो गल्फ मॅनेजमेंट असोसिएशन (IGMA)
कमी फी मध्ये उच्च दर्जाचे प्लेसमेंट
इतर नामांकित संस्थांच्या तुलनेत ‘एसव्हीआयएमएस’ची फी अत्यंत माफक आहे, मात्र येथील प्लेसमेंटचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. देशातील आघाडीच्या कंपन्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही येथील विद्यार्थी मोठ्या पॅकेजवर नोकरी मिळवत आहेत.
३१ मार्चपूर्वी प्रवेश घेणाऱ्यांसाठी विशेष भेट!
जे विद्यार्थी ३१ मार्च २०२६ पूर्वी कॉलेज निवड प्रक्रियेसाठी नोंदणी करतील, त्यांना महाविद्यालयाकडून:
ब्रँडेड लॅपटॉप (मोफत)
कॉर्पोरेट अटायर (युनिफॉर्म)
देशांतर्गत इंडस्ट्रियल व्हिजिट (किंमत ५०,००० रुपये)
या सवलती पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत.
पालकांसाठी मार्गदर्शनाची सोय
प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी धर्मेंद्र जगताप (Head – Student & Institute Relations) हे स्वतः मार्गदर्शन करत आहेत. कोकणच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेशासाठी किंवा निवडीची तयारी कशी करावी, यासाठी ९८९२५७१४६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आजच www.svims.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करा.

“आमचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देणे नसून, त्यांना प्रत्यक्ष उद्योगांमधील आव्हानांसाठी तयार करणे हा आहे. आयआयएम मुंबईतील हा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल.”
धर्मेंद्र जगताप, एसव्हीआयएमएस, बिजनेस स्कूल-मुंबई


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!