WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम


सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

 

चिपळूण:  दापोली मतदार संघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मी सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भीत इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या चिपळुणातील जाहीर सभेत दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे दापोली मतदार संघातील राजकीय वातावारण आणखी तापल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महायुती झाली. मात्र चिपळूण विधानसभा मतदार संघात संगमेश्वर महायुती झाली मात्र चिपळुणात झालेली नाही. तसेच दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणुकीला सामोरे जात आहे. चिपळुणात मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. सभेत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, खेड पालिकेच्या निवडणूकीत विरोधकांना भोपळा देखील फोडता आला नाही. काही कारणाने येथे युती झाली नाही. या निवडणूकीत मला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. चिपळुणातील सभा ही महायुतीची असल्याने जास्त बोलणार नाही. मात्र मी सर्वाना पुरून उरेन हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असा इशारा दिला. त्यांच्या या भाषणावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र स्मित हास्य करत अधिक बोलण्याचे टाळले. त्यामुळे या निवडणूकीत दापोली मतदार संघातील विरोधक गृहराज्यमंत्र्याची पकड करणार की, मंत्री कदम बोलल्याप्रमाणे सर्वांना पुरून उरणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!