मुख्याधिकारी विशाल भोसले यांचा उद्या गौरव समारंभ
नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने आयोजन
चिपळूण : येथील नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल श्रीरंग भोसले यांची बढती होऊन रहिमतपूर नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी चिपळूण नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे.
हा गौरव समारंभ चिपळूण नगर परिषद कामगार संघटना व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे चिपळूण शाखाध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, चिपळूण नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सुजित जाधव, ज्येष्ठ व्यापारी व माजी नगरसेवक ग्रामसेवक रेडीज, क्रीडाइ संस्थेचे राजेश वाजे, नाटक कंपनी चिपळूणच्या वतीने योगेश बांडागळे, उपमुख्याधिकारी अनंत मोरे आदी मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत.
या कार्यक्रमाला चिपळूणमधील सर्व संस्था, मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.











