चिपळूण
– जिल्ह्यातील अनेक मुले तसेच नागरिक शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहेत. त्यांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा यासाठी पोस्ट ऑफीस मार्फत परदेशात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.*
फराळ परदेशात पाठविण्यासाठी काही निवडक देशांसाठी ५ किलो पार्सलचे दर पुढीलप्रमाणे आहेत. ऑस्ट्रेलिया ४ हजार ९९७ रुपये, कॅनडा ५ हजार २६ रुपये, यु.ए.ई. १ हजार ८९९ रुपये, यु.के. ४ हजार ५३७ रुपये आणि जर्मनी ३ हजार ६९९ रुपये. या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पार्सल पाठविता येईल. त्यासाठी इच्छुकांनी नजीकच्या पोस्ट ऑफीसला संपर्क करावा, असे डाकघर अधीक्षक ए.डी. सरंगले यांनी कळविले आहे. रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघर येथे फराळ पॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
Views: 190












