WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सती येथील गादी कारखाना आगित खाक


सती येथील गादी कारखाना आगीत खाक

चिपळूण ः चिपळूण कराड मार्गावरील सती येथे महामार्गालगत असलेल्या एका गादी कारखान्यास सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अनाचक आग लागली. या आगीत गादी कारखाना जळून खाक झाला. दरम्यान पालिकेच्या अग्नीशामक बंबाच्या साह्याने ही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी संबंधीत मालकाचे सुमारे २ लाखाचे आर्थीक नुकसान झाले आहे.
चिपळूण कराड महामार्गालत सती येथे रस्त्यालगतच विजय यादव यांचा गादी कारखाना होता. सायंकाळी पाच वाजता विजय यादव व त्यांचे सहकारी कारखान्यातच काम करत होते. यादरम्यान अचानक शॉर्ट सर्किटटने होऊन आग लागली आणि कापसाने त्वरित पेट घेतला. आग भडकल्याने त्यांना तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. पालिकेच्या अग्नीशमन दलास माहिती दिल्यानंतर बंबाच्या साह्याने आग विझवण्यात आली. आग विझवण्यासाठी परिसरातील लो जमले होते. महामार्गावरच हा कारखाना असल्याने येथे मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत माहिती घेतली. या घटनेत कापूस, मशिनरी असे एकूण २ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विजय यादव यांनी सांगितला. या गादी कारखान्या लगत टायर दुकान होते. टारचे दुकान बंद असल्याने तेथे सुदैवाने आगीची झळ पोहोचली नाही.


516
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!