WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अखेर डॉ. कांचन मदार निलंबित


अखेर डॉ. कांचन मदार निलंबित

चिपळूण, ता. ७ ः तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार यांच्यावर आरोग्य विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट देण्याच्या बदल्यात एका महिलेकडून 4 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एसीबीच्या कारवाईनंतर डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला होता. अखेर आरोग्य विभागाने मदार यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

डॉ. कांचन मदार यांनी गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट देण्याच्या बदल्यात 4500 रुपयांची लाच मागितली होती. ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजी सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डॉ. मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर निर्णय घेत अखेर आरोग्य विभागाने डॉ. कांचन मदार यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सुशिक्षित महिलेच्या तक्रारीनंतर जवळपास सहा तासात अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली होती. डॉ. कांचन मदार हे वैद्यकीय क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मोठं नाव आहे. शुल्लक रकमेची लाच घेताना अटक झाल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. डॉ. मदार यांच्यावर कारवाई झाल्यानंतरही लाचखोरीची प्रकरणे थांबेलली नाहीत. दोन दिवसांपुर्वीच सावर्डे येथील मंडळ अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात अडकला होता. लाचलुचपतच्या कारवाया सातत्याने सुरू असल्या तरी निर्ढावलेले अधिकारी, कर्मचारी मात्र यातून बोध घेताना दिसत नाही.


617
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!