WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जनसामान्यांची सेवा हेच लायन्स सभासदाचे ध्येय : प्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले


जनसामान्यांची सेवा हेच लायन्स सभासदाचे ध्येय : प्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले

सावर्डे लायन्स क्लबला दिली सदिच्छा भेट, विविध सेवाकार्यांचा गौरव

सावर्डे : समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत जनसामान्यांसाठी विविध प्रकारची सेवा करणे हे प्रत्येक लायन्स सभासदाचे प्रमुख ध्येय असल्याचे प्रतिपादन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ चे प्रांतपाल एम. जे. एफ. लायन्स डॉ. विरेंद्र चिखले यांनी केले. सावर्डे लायन्स क्लबला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ. चिखले म्हणाले की, लायन्स क्लबच्या सेवाकार्यातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचतो. जगातील सुमारे २१० देशांमध्ये १४ लाखांहून अधिक लायन्स सभासद विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. सावर्डे लायन्स क्लबच्या उपक्रमांतूनही हीच भावना प्रकर्षाने जाणवते, असे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान चिपळूण तालुक्यातील कोसबी-फुरूस विद्यालयाला सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर मशीनचे वितरण करण्यात आले. प्रांतपाल डॉ. चिखले यांच्या हस्ते ही मशीन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कळंबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाला सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रकाश राजेशिर्के, सचिव ला. राजेश कोकाटे, खजिनदार ला. डॉ. अरुण पाटील, चेअरमन ला. डॉ. कृष्णकांत पाटील यांच्यासह माजी अध्यक्ष व अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डिस्ट्रिक्ट खजिनदार ला. सांगोडकर, ला. विनया चिखले आणि कोसबी-फुरस विद्यालयाचे शिक्षकवृंद यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

हा कार्यक्रम आगवे येथील सुहासिनी फार्म येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुहासिनी गार्डनचे उद्घाटन श्रीमती सुहासिनी चंद्रकांत निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबचे अध्यक्ष प्रकाश राजेशिर्के यांनी सावर्डे लायन्स क्लबच्या वाटचालीचा आढावा मांडला. तर सचिव राजेश कोकाटे आणि खजिनदार डॉ. अरुण पाटील यांनी अनुक्रमे अहवाल वाचन केले.

यावेळी प्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले आणि सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!