WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

माजी सरपंच शांताराम सुर्वे यांचे निधन


माजी सरपंच शांताराम सुर्वे यांचे निधन

चिपळूण : तालुक्यातील नवीन कोळकेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच शांताराम सीताराम सुर्वे (वय ८२) यांचे दिनांक 15 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

कै.शांताराम सुर्वे हे विद्यमान सरपंच अनंत सुर्वे (बावाशेठ)यांचे वडील होत. त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. सरपंच आणि उपसरपंच म्हणून त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांना “आदर्श शेतकरी” म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
ते केवळ राजकीय व सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर शेतीतही प्रगतीशील विचारांचे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली.

कै.सुर्वे यांनी सांप्रदायिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले.ते माळकरी होते. नियमित पंढरपूरची वारी करत असत. तसेच ते एकत्र कुटुंबपद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवून आपुलकीने संसार चालवला. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, मदतीला धावून जाणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या निधनाने सामाजिक, कृषी व धार्मिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

 

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!