WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सावर्डेत उद्या स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा


सावर्डेत उद्या स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा

सावर्डे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आमदार शेखर गोविंदराव निकम, जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अजितदादा पवार यांचे दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दु:खद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा आधार असलेला नेता गमावला आहे.
दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी सावर्डे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक व सह्याद्री परिवारातील सदस्यांनी या शोकसभेस उपस्थित राहून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!