WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात साजरा होणार भव्य शिवजयंती उत्सव


चिपळुणात साजरा होणार भव्य शिवजयंती उत्सव

पूर्वतयारी बैठक उत्साहात संपन्न

चिपळूण : येत्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात शिवजयंती पूर्वतयारी बैठक रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिवजयंती अधिक भव्य, वैचारिक आणि सर्वसमावेशक स्वरूपात साजरी करण्यासाठी या बैठकीत सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान साहसी खेळांचे आयोजन, झांज पथक, हळदीकुंकू समारंभ, होम मिनिस्टर स्पर्धा, नामवंत व अभ्यासू व्यक्तीचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांवर चर्चा झाली. शिवजयंतीच्या माध्यमातून समाजात संस्कार, विचार आणि एकोपा वृद्धिंगत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस उपस्थित राहू न शकलेल्या सदस्यांनीही ग्रुपवर आपल्या सूचना, कल्पना व संकल्पना मांडाव्यात, जेणेकरून त्यांचा पुढील नियोजनात समावेश करता येईल, असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीला राणीताई महाडिक, पूर्वा तांदळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण विकास सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. राणीताई महाडिक यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त कोणाकडे नवीन उपक्रमांच्या संकल्पना असतील, त्यांनी पुढील बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होऊन किंवा वेळेत ग्रुपवर त्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले.
बैठकीच्या शेवटी सर्वांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी “जय शिवराय”, “एक मराठा – लाख मराठा” या गजराने परिसर दुमदुमून गेला.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!