WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

फळविक्रेते गौतम जाधव यांचे आकस्मिक निधन


फळविक्रेते गौतम जाधव यांचे आकस्मिक निधन

चिपळूण : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे सभासद, पाग बौद्ध कॉलनी येथील रहिवासी, शहरातील प्रसिद्ध फळविक्रेते गौतम सीताराम जाधव यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. निधन समयी ते 60 वर्षांचे होते.

गौतम जाधव हे दिवंगत पत्रकार उत्तम कुमार जाधव, हर्षवर्धन गायन पार्टीचे प्रसिद्ध गायक दिवंगत अनंत जाधव, चिपळूण नगर पालिकेतील कर्मचारी प्रीतम जाधव यांचे बंधू तर आरंभ हॉटेलचे मालक हेमंत अनंत जाधव यांचे चुलते होत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक समोर हॉटेल आरंभ शेजारी त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय होता. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात ते परिचित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून दिनांक 25 जानेवारी रोजी वधू निश्चितीचा कार्यक्रम पार पडला होता. घरात या विवाह सोहोळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असतानाच गौतम जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!